भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्सच्या आयोजकांनी भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द केला आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका यामुळं भारतीय संघानं खेळातून माघार घेतली आणि काल आयोजकांना आपला निर्णय कळवला.