डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

WavesX १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा

वेव्हज परिषदेतला स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्हजएक्स सुमारे १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAI चे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी म्हटलं आहे. विविध स्टार्टअप्सनी वेव्हजसाठी एकूण एक हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी सुमारे ३० स्टार्टअप्सनी वेव्हजमधल्या गुंतवणूकदारांसमोर त्यांचे विचार मांडले आहेत. वेव्हजच्या स्टार्टअप पॅव्हेलियनमध्ये सुमारे ११० स्टार्टअप्सनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यांना काही निधी मिळण्याची अपेक्षा आहे. स्टार्टअप गुंतवणूकदार राजेश जोशी यांनी वेव्हज परिषदेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यामुळे स्टार्टअप्सना एकाच ठिकाणी एकत्र येण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.