पहिली जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृक्श्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्त्वं, विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्यासह जगभरातले सर्जनशील विचारसरणीचे आशय निर्माते सहभागी होणार आहेत. त्याशिवाय शंभर देशांमधले सुमारे ५ हजार प्रतिनिधी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | April 30, 2025 4:32 PM | WAVES 2025
पहिली जागतिक WAVES summit India उद्यापासून मुंबईत
