वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत सुरु होत आहे. या परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं आहे.
वेव्हजच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी यासंदर्भातल्या लेखात व्यक्त केला आहे.