मुंबईत होणाऱ्या वेव्स 2025 या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया या अल्बमचं अनावरण करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये 5 गाणी असून त्यांची रचना ऑस्कर विजेत्या गीतकार एम. एम. किरवाणी यांनी केलेली आहे. संगीत अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी सत्यम शिवम् सुंदरम या गीताला संगीत दिल आहे.
गीतकार प्रसून जोशी आणि गायक संगीतकार शंकर महादेवन यांनी ऊंचा आसमान हे गीत तयार केलं आहे. 3 वेळा ग्रामी पुरस्कार प्राप्त गायक रिकी केज यांनी सिंफनी ऑफ इंडिया हे गीत तर देसी पॉपचे निर्माते मीत ब्रदर्स यांनी शुभारंभ आणि हाय इन द् स्काय ही गीतं तयार केली आहेत. 5 गाण्यांचा हा अल्बम तयार करण्यासाठी 5 विशिष्ट आणि विभिन्न शैलींचा वापर करण्यात आला आहे.