मुंबईत येत्या १ मे ते ४ मे दरम्यान वेव्ज अर्थात ‘विश्व दृकश्राव्य मनोरंजन शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडं आहे.
मुंबईमध्ये होणाऱ्या वेव्हज २०२५ या शिखर परिषदेचं आयोजन महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे, नागरिकांनी या परिषदेतील दालनांना भेट द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशील उत्कृष्टतेचं प्रदर्शन करण्याची एक मोठी संधी असल्याचं ते म्हणाले.