April 12, 2025 12:43 PM

printer

मे महिन्यात होणारी वेव्हज् ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असणार – मुख्यमंत्री

येत्या मे महिन्यात होणारी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्हज् ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असून, जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत त्यांनी काल वेव्हज् उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला; त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.