डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वेव्हज २०२५ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबईत येत्या १ मे पासून ४ मे पर्यंत आयोजित वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 

 

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधले परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. हिंदी, मराठी, तामीळ चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. त्साठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहनही उदय सामंत यांनी केलं. जगभरातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले…

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.