WAVES 2025: कलाकारांनी आपली आवड जपावी-जजेल होमावजीर

व्हेव्ज शिखर परिषदेत आयोजित  केलेल्या  कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव  आहे, असं या स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावजीर यांनी सांगितलं. भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही, या स्पर्धेमुळे कलाकारांना आपली कला बाजारपेठेत नेण्याची संधी निर्माण होईल, असं होमावजीर म्हणाले. या स्पर्धेसाठी फँटसी, साय फाय, भावनिक असे विविध विषय प्राप्त झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. कलाकारांनी आपली आवड जपावी असं आवाहनही होमावजीर यांनी  केलं.