वेव्ह्ज २०२५ परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी एका लेखाद्वारे केलं आहे. वेव्ह्जच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातला माध्यम आणि मनोरंजन उद्योग आज अडीच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त असून सर्जनशीलता, नवोन्मेष आणि स्वयंउद्योजकता क्षेत्रात जगाचं नेतृत्व करायचं भारताचं ध्येय वेव्ह्ज २०२५ मधून अधोरेखित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.