माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्ज या उपक्रमांतर्गत इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातल्या स्पर्धकांना भारताचं सौंदर्य, भौगोलिक दृश्यं, नवोक्रम, वारसा, संस्कृती तसंच, प्रगती आणि परिवर्तन अधोरेखित करणारे २ ते ३ मिनिटांचे व्हिडीओ सादर करण्याच आव्हान देण्यात आलं होतं. या स्पर्धेत १ हजार ३२४ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर, प्रत्येक श्रेणीतल्या पाच अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. हे स्पर्धक येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ह्जच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
Site Admin | April 26, 2025 8:32 PM | WAVES 2025
waves 2025: इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धेचं आयोजन
