मुंबईत वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार आहे. भारत पॅव्हेलियनच्या श्रुती, कृर्ती, दृष्टी आणि सर्जकाची कल्पकता या चार भागांमधून प्रेक्षकांना भारताच्या कथाकथनाच्या परंपरेचं दर्शन घडेल. श्रुतीमध्ये कथाकथनाची मौखिक परंपरा, कृतीमध्ये लेखन परंपरा, दृष्टीमध्ये दृश्य माध्यमांचा विस्तार आणि सर्जकाची कल्पकता यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील कथाकथन यांचा समावेश आहे.
हे पॅव्हेलियन जगाच्या कथाकथनाच्या परंपरेला आकार देण्यातल्या भारताच्या योगदानाबाबतचा संग्रह असेल.