April 11, 2025 8:27 PM | WAVES 2025

printer

WAVES 2025 : बंगळुरू इथं VFX स्पर्धेची अंतिम फेरी

वेव्हजची राष्ट्रीय स्तरावरची दक्षिण विभागाच्या व्ही एफ एक्स स्पर्धेची अंतिम फेरी आज बंगळुरू इथं पार पडली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जैन विद्यापीठ आणि अभय फाऊंडेशन यांच्या सहयोगानं ही स्पर्धा आयोजित केली होती. या फेरीसाठी १ हजाराहून अधिक स्पर्धकांमधून १४ जणांची निवड करण्यात आली होती. आजच्या विभागीय अंतिम फेरीच्या विजेत्याला मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या अंतिम फेरीसाठी पाठवलं जाणार आहे, अशी माहिती अभय फाऊंडेशनचे सचिव आर. के. चंद  यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.