March 14, 2025 1:54 PM | WAVES 2025

printer

WAVES 2025 : ॲनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धेसाठी ७८ स्पर्धक दुसऱ्या फेरीत दाखल

वेव्हज २०२५ या उपक्रमासाठी देशभरातल्या आशय निर्मात्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या उपक्रमातल्या ॲनिमेशन फिल्ममेकर्स स्पर्धेसाठी ७८ स्पर्धकांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. अभिजात कथानक, मनोरंजनाचं मूल्य, तांत्रिक बाजू अशा विविध निकषांच्या आधारावर या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धकांमध्ये विद्यार्थी, हौशी निर्माते, व्यावसायिक निर्माते तसंच निर्मिती स्टुडिओंचा समावेश आहे. भारतासह लंडन, बाली आणि कॅनडाहूनही अर्ज दाखल झाले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.