माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्टार्टअप अॅक्सिलरेटर उपक्रम वेव्हएक्स अंतर्गत वेव्हएक्स स्टार्टअप चॅलेंज २०२५ ची सुरूवात केली आहे. देशभरातल्या स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बहुभाषिक भाषांतर प्रणाली विकसित करण्यासाठी या राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात.
‘भाषासेतु – आजच्यासाठी भाषेचं तंत्रज्ञान’ हा या चॅलेंजचा उद्देश असून किमान बारा प्रमुख भारतीय भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वास्तविक वेळी भाषांतर, लिप्यंतरण आणि व्हॉइस-सक्षम साधनांच्या विकासाला प्रोत्साहन देणं आहे. मंत्रालयानं व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी किमान पात्रता निकष निश्चित केलेले नाहीत. ज्यामुळे कोणत्याही स्टार्टअप्सना यासाठी अर्ज करता येतील.
विजेत्या स्टार्टअप्सना वेव्हएक्स अॅक्सिलरेटर अंतर्गत इनक्युबेशनतर्फे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मदत दिली जाईल. यासाठी कालपासून नोंदणी सुरू झाली असून आवश्यक कागदपत्रं सादर करण्याची शेवटची तारीख २२ जुलै आहे.