May 3, 2025 8:01 PM | WAVES 2025

printer

वेव्हज् बाजारमधे गेल्या २ दिवसात 1 हजार कोटीपेक्षा जास्त व्यवसाय संधी खुल्या

वेव्हज् २०२५ च्या मंचावर वेव्हज् बाजारमधे गेल्या २ दिवसात एक हजार कोटी पेक्षा जास्त व्यवसाय संधी खुल्या केल्या आहेत. कालच्या दिवसात अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली तर आज दिवसभरात आठशे कोटी रुपयांचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार यांनी सांगितलं की वेव्हज् २०२५ हा उपक्रम कल्पनेपलिकडे यशस्वी झाला आहे.

 

दीड हजारापेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी वेव्हज बाजार पोर्टलवर झाली असून त्यात ८ हजार खरेदीदार तर ४ हजार विक्रेते आहेत. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि कोरियन उद्योग CJ ENM तसंच अन्य मोठ्या उद्योगांनी या परिषदेदरम्यान महत्त्वाचे करार केले.असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.