डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 3, 2025 7:03 PM | WAVES 2025

printer

वेव्हज् परिषदेत इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी – अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पेरिटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण

मुंबईत भरलेल्या वेव्हज् परिषदेत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज इंडियाज लाईव्ह इव्हेंट्स इकॉनॉमी – अ स्ट्रॅटेजिक ग्रोथ इम्पेरिटिव्ह या श्वेतपत्रिकेचं अनावरण केलं. या श्वेत पत्रिकेत भारतातल्या वेगाने विस्तारणाऱ्या लाईव्ह या प्रकारच्या मनोरंजन उद्योगाचं व्यापक विश्लेषण देण्यात आलं आहे.

 

या विश्लेषणात मनोरंजन क्षेत्रातले उदयोन्मुख प्रवाह, मनोरंजन क्षेत्राच्या वाढीसाठीचे पर्याय तसंच, सातत्याने उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसींचा समावेश आहे. भारताच्या लाईव्ह इवेंट्स विभागाचा विस्तार १५ टक्क्यांनी वाढल्यामुळे गेल्यावर्षी अंदाजे १३ अब्ज रुपयांचा महसूल निर्माण झाल्याचंही या विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे.