माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कला सेतू या रियल टाईम लँग्वेज टेक फॉर इंडिया चॅलेंजला सुरुवात केली. भारतातल्या आघाडीच्या एआय स्टार्टअप्सना अनेक भारतीय भाषांमधला मजकूर दृकश्राव्य अथवा ग्राफिकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी अॅप्लिकेशन विकसित करण्याचं आव्हान या उपक्रमात ठेवण्यात आलं आहे. लेखी साहित्यापासून व्हिडीओ, ग्राफिक्स आणि ऑडिओ निर्मितीवर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत www.wavex.wavesbazaar.com या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.
Site Admin | July 8, 2025 7:52 PM | Kalaa Setu | WAVE
WAVE: कला सेतू या रियल टाईम लँग्वेज टेक फॉर इंडिया चॅलेंजला सुरुवात
