डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पिण्याचं पाणी जपून वापरण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसंच शहरी भागातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी पुढचे दोन महिने पिण्याचं पाणी जपून वापरा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी राज्यातल्या पाण्याच्या स्थितीबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.