डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात राबवण्यात येतोय जल व्यवस्थापन कृती पंधरवडा

राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत येत्या २२ तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. लाभक्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
नांदेड इथं जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात काल गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्ह्यातल्या जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसंच शेतकरी, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज याअंतर्गत विविध कार्यालयांमध्ये स्वच्छ आणि सुंदर माझे कार्यालय तसंच जलपुनर्भरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.