पाण्याची भविष्यातल्या पिढ्यांसाठी संरक्षण करण्याची गरज – प्रधानमंत्री

आज जागतिक जल दिवस आहे. आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो. जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी  जागरूकता निर्माण करून, कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे. जागतिक जल दिवस हा २०३० सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडला  आहे. ‘हिमनद्यांचं संवर्धन’, ही  यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचं  संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. पाणी ही मानवी संस्कृतीची जीवनरेखा असून, भविष्यातल्या पिढ्यांसाठी त्याचं संरक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

 

जलसंकट हा जागतिक चिंतेचा विषय बनला असला, तरी भारताने या  आव्हानाचं संधीत रूपांतर केलं आहे, असं केंद्रीय जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागतिक जल दिना निमित्त समाज माध्यमावर म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.