राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांपुढच्या, कचरा व्यवस्थापनातल्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये कचऱ्याचं योग्य वर्गीकरण होणं अत्यावश्यक आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आधीच सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाकडून अशा सर्व ठिकाणी आवश्यक ती मदत दिली जाईल, असं ते म्हणाले.
Site Admin | July 14, 2025 7:11 PM | waste management
कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होणार
