देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा

देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओदिशा इथे उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड , कोकण, गोवा , विदर्भ , कर्नाटकाचा किनारी भाग आणि पूर्व उत्तर प्रदेश इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.