डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 20, 2025 7:04 PM | Maharashtra

printer

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी राज्यात ‘वॉर रूम’ची स्थापना

राज्यातल्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली  प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने शासन वॉर रूम स्थापन करणार आहे. हा विशेष कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली काम करणार असून अध्यक्षपदी सेवानिवृत्त आयए एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली आहे.

 

एकाचवेळी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ एका रुग्णाकडून घेतला जाण्याचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं असून राज्य आणि केंद्रसरकारच्या सर्व आरोग्य योजनांविषयी माहिती, मार्गदर्शन आणि मदत मिळावी याकरता 1800 123 2211 हा  दूरध्वनी  क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे.