वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक नवी दिल्लीत सुरु

वक्फ घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत सुरु आहे. यामध्ये संबंधितांची मतं जाणून घेतली जात असून आज मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल उलेमा आणि नवी दिल्लीच्या इंडियन मुस्लीमस फॉर सिविल राईट्स या संघटनांचे प्रतिनिधी समितीसमोर आपलं म्हणणं मांडत आहेत. वक्फ च्या कायदादुरुस्तीसाठी या संयुक्त संसदीय समितीची स्थापन करण्यात आली असून समितीची पहिली बैठक या महिन्यात २२ ऑगस्ट रोजी झाली होती. या समितीमध्ये एकूण ३१ सदस्य आहेत.