संसदेत वफ्क सुधारणा विधेयकवरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांचं आवाहन

वफ्क सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजीजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. नवीदिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या विधेयकाविषयी काही राजकीय नेते अफवा पसरवत आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंदनीय असल्याचं ते म्हणाले. संयुक्त संसदीय समितीत या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली आहे. या समितीनं विविध संघटना आणि नागरिकांची या विधेयकाबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं रिजीजू यांनी सांगितलं.