डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २० मे रोजी सुनावणी

वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २० मे रोजी सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. याचिकाकार्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्यांचं निवेदन १९ मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज यांच्या पिठानं सांगितलं. १९९५ च्या वक्फ कायद्यातल्या तरतुदींना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर कोणताही विचार केला जाणार नाही,  असं न्यायालयानं स्पष्ट केलं.