डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूरी

वक्फ सुधारणा विधेयक २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी तर राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं.  वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. वक्फच्या नोंदींचं डिजिटायजेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधीत्व दिलं जाईल. तसंच केंद्रीकृत पोर्टलद्वारे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जाईल.