डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १५ मे रोजी सुनावणी

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या १५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज  सुनावणी होणार होती.मात्र आपण लौकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल, असं सांगून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी  पुढची तारीख दिली आहे. 

 

या संदर्भात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं  काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारनं कायद्यातल्या काही  तरतुदींना स्थगिती दिली आहे. नोंदणीकृत आणि अधिसूचित वक्फ मालमत्ता तसंच वापरकर्त्यांकडून वक्फ घोषित झालेल्या जमिनींच्या सद्यस्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.