वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चा केल्यानंतरच हे विधेयक आणण्यात आल्याचं अल्पसंख्यक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं.  वक्फच्या मालमत्तेत मुस्लिमेतर व्यक्ती हस्तक्षेप करणार नाही, याचा लाभ केवळ मुस्लिम व्यक्तींनाच मिळेल, असं रिजीजू यांनी स्पष्ट  केलं. या विधेयकाचा हेतू वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन करणं असून मुस्लिमांच्या  धार्माचरणात हस्तक्षेप करण्याचा नाही असंही त्यांनी सांगितलं. 

 

वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकार समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार सय्यद नासेर हुसैन यांनी केला. हे विधेयक चुकीच्या माहितीच्या आधारे बनवलं गेल्याचं हुसैन म्हणाले. संयुक्त संसदीय समितीत बहुसंख्य सदस्यांनी विधेयकाला विरोध केला होता. त्यामुळे सरकारने वक्फशी संबंध नसणाऱ्या लोकांना समितीत चर्चेसाठी बोलावलं गेलं असा आरोपही त्यांनी  सरकारवर केला. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.