भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 24 व्या फेरीत वांग यी सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकीत सीमेवरील परिस्थिती, व्यापार आणि विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी या महिन्याच्या शेवटी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर जाणार आहेत; त्यापूर्वी ही बैठक होत आहे.