December 28, 2025 7:52 PM | w 35 solapur tennis

printer

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत वैदेही चौधरीला एकेरी गटाचं विजेतेपद

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत आज वैदेही चौधरी हिनं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात वैदेहीनं जपानच्या मिचिका ओझेकी हिचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत वैदेहीनं वैष्णवी अडकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.