VVPAT रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणीची मागणी करणारी याचिका फेटाळली

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधल्या व्हीव्हीपॅट रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्यापुढं आज यावर सुनावणी झाली. संबंधित याचिकाकर्त्यानं दाखल केलेली जनहितार्थ याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं याआधी फेटाळली आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असं या पीठानं सांगितलं.