महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडायचे निर्देश दिले. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली.
Site Admin | November 7, 2025 8:53 PM | VVPAT
VVPAT वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटिस