अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

अमेरिकेच्या ४७व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी सीमा सील करण्याची ग्वाही दिली असून कोट्यवधी रुपयांच्या करकपातीचा प्रस्ताव दिला आहे तर हॅरिस यांनी गर्भपाताच्या हक्कांची बाजू मांडली आहे आणि कामगार कुटुंबांसाठी अन्न, घरांचा खर्च कमी करण्याचं आश्वासन दिलं आहे. ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये भाषण करून प्रचाराचा समारोप केला तर हॅरिस यांनी पेन्सिल्व्हेनिया या राज्यात आपला प्रचार संपवला. फ्लोरिडा विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार आतापर्यंत ८२ दशलक्षांहून अधिक लोकांनी मतदान केलं असून सुमारे २४४ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. ५३८ इलेक्टोरल कॉलेज मतांसह २७० मतं मिळविणारा उमेदवार विजयी होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.