July 28, 2024 2:25 PM | Venezuela

printer

व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान

व्हेनेझुएलामध्ये आज अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासमोर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आव्हान उभं केलं असून एडमंडो गोन्झालेझ उरुतिया हे मादुरो यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. युनायटेड सोशालिस्ट पक्षाचे नेते निकोलस मादुरो हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.