निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातले पदवीधर मतदारसंघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातल्या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या नव्यानं तयार करायची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांना mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येतील. २५ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना १० सप्टेंबरपर्यंत त्यावर दावे आणि हरकती सादर करता येतील. अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत.
Site Admin | November 8, 2025 6:25 PM | Election Commission | Maharashtra | Voter Lists
शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तयार करायची प्रक्रिया सुरू