छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून चित्ररथाद्वारे मतदार जनजागृती मोहिम

छत्रपती संभाजीनगर इथं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शासकीय सेवेतल्या एका अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुसऱ्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यास ताकीद दिली आहे. यासंदर्भात खुलताबादच्या कोहीनूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.