June 21, 2025 2:51 PM | Vladimir Putin

printer

मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल- व्लादिमिर पुतीन

भारत आणि रशिया दरम्यानच्या दीर्घकालीन सहकार्याबाबत मॉस्कोच्या कृती आराखड्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटलं आहे. ते काल सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या पूर्ण सत्राला संबोधित करत होते. 

 

‘सामायिक मूल्य:बहुध्रुवीय जगातला विकासाचा पाया’, ही सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच २०२५ ची संकल्पना आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या परिषदेत  भारताचं प्रतिनिधित्व केलं. परिषदेच्या दोन सत्रांमध्ये त्यांनी बीजभाषण दिलं. कृत्रिम बुद्धिमत्तेत भारताची प्रगती आणि नैतिक आणि समावेशक तांत्रिक विकासाबाबतचा  दृष्टिकोन त्यांनी यावेळी स्पष्ट केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.