विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार साहित्य, सामाजिक कार्य, लोककला, अभिनय आणि संगीत यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना दिला जातो. शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ २६ नोव्हेंबरला मुंबईत होत आहे. त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार दिला जाईल. शाहीर राजेंद्र राऊत, प्रदीप शिंदे, अभिनेते जयवंत वाडकर, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री रिंकू राजगुरू हेही यंदाच्या मृदगंध पुरस्काराचे मानकरी आहेत.
यापूर्वी विक्रम गोखले, पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.