केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ‘विश्वास’ योजनेला प्रारंभ

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी आज विश्वास ही योजना सुरु केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायद्यांतर्गत दंडात्मक नुकसानभरपाई सुसंगत करुन खटले कमी करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३८ वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत मांडविय यांनी या योजनेबरोबरच विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ केला. विवरणपत्र भरणं, वापरकर्त्यांचं व्यवस्थापन, तसंच ई-ऑफिस आणि स्पॅरो, यांच्या सुधारित आवृत्यांचा त्यात समावेश आहे. भविष्य निर्वाह निधी अंशतः काढून घेण्यासाठीच्या सुलभ नियमांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.