विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलातर्फे समुद्र शक्ति 2025 या पाचव्या इंडो-इंडोनेशियाई संयुक्त द्विपक्षीय सागरी सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
शुक्रवार पर्यंत सुरू राहणाऱ्या या सरावादरम्यान सहभागी तुकड्यांमधील पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखालील ताफ्याची आयएनएस करवत्ती ही पाणबुडी रोधी युद्ध नौका आणि इंडोनेशियन नौदलाचे केआरआय जॉन ली या जहाजाचा समावेश आहे.
परस्पर कार्यक्षमता वाढवणं, परस्पर सामंजस्य मजबूत करणं आणि दोन्ही नौदलांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणं हा या समुद्र शक्ति सरावाचा उद्देश आहे.