डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नालासोपारा प्रकरणात विनोद तावडे यांचा काँग्रेसविरोधात मानहानीचा दावा

भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी नालासोपारा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असला तरीही सत्य सर्वांच्या समोर आहे, असं तावडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. कथित ५ कोटी रुपये निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात कुठेच सापडले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसचं खालच्या दर्जाचं राजकारण आणि देशाला दिशाभूल करण्याचा त्यांचा हतबल प्रयत्न उघड होतो, असंही ते म्हणाले.