डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

साहित्यक्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्यप्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या त्यांच्या साहित्यकृतीसाठी १९९९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची कादंबरी आणि ‘सब कुछ होना बचा रहेगा’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे.