डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विनेश फोगाट यांच्या कामगिरीचं कौतुक

विनेश फोगाटनं आत्तापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं. तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे, पण तरीही सर्व देशवासीयांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मूर्मू यांनी नमूद केलं.

 

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीही निराशा व्यक्त केली. यामुळे कोट्यवधी भारतीयांना धक्का बसल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये नमूद केलं.