विकसित भारत रोजगार हमी आणि अजीविका मिशन (ग्रामीण) योजने बद्दल चुकीचा दावा करणाऱ्या एका चित्रफितीचं सरकारनं खंडन केलं आहे. या योजने अंतर्गत कायदेशीर किमान वेतन निश्चित केलं जाणार नाही, असा दावा करणारी चित्रफीत दिशाभूल करणारी आहे, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. कामगारांच्या किमान वेतनात कोणत्याही प्रकारची कपात होणार नसून नागरिकांनी सतर्क रहावं आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा, असं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे.
Site Admin | January 18, 2026 6:46 PM | viksot bharat rojgar hami
किमान वेतन निश्चितीबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओचे सरकारने केले खंडन