December 23, 2025 1:28 PM | ViksitBharat_G_RAM_G

printer

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज दिली. चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलंय की, आता १०० दिवसांऐवजी सव्वाशे दिवसांच्या रोजगाराची हमी ग्रामीण भागत सरकारने दिली आहे. मनरेगा या पूर्वीच्या योजनेच्या नावाखाली नवीन योजनेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.  जीरामजी योजनेत काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्त्याचीही तरतूद आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामीण भागात पायाभूत सोयी सुविधा, जलसंवर्धन आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना उभारण्यावर योजनेचा भर राहील, असं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितलं.