डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन

आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. वातावरण बदलामुळे शेती पारंपरिक पद्धतीने करता येत नाही तिच्यात गुंतवणूक होणं आवश्यक आहे, मात्र ७९ टक्के शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्याच्यात गुंतवणूक करण्याची क्षमता नाही. अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दुष्टचक्रामधून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी योजना आखून सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.