विकसित भारत जी राम जी योजनेबाबत काँग्रेस दिशाभूल करत असल्याची कृषीमंत्र्यांची टीका

विकसित भारत जी राम जी योजनेबाबत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीच्या मनरेगा योजनेतून काँग्रेसने दिलेले हक्क केवळ कागदावर राहिले असं सांगून ते म्हणाले की, काँग्रेसने आपल्या आदर्श आणि कल्पनांशी फारकत घेतली आहे.

 

मनरेगामधून १० कोटी बांधकामं झाली त्यातली साडेआठ कोटी कामं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केली आहेत असं ते म्हणाले. या सरकारने २५ कोटी जनतेला दारिद्रयरेषेच्यावर आणलं असून अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग, महिला आणि गरिबांना जीरामजीमधे प्राधान्य देण्यात येणार आहे अस त्यांनी स्पष्ट केलं.