विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५च्या नोंदणीसाठी मुदतवाढ

शिक्षण मंत्रालयाने विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५ साठी नोंदणीची अंतिम मुदत येत्या ११ ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम ही एक देशव्यापी नवोन्मेष चळवळ असून, देशातल्या अडीच लाखापेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेणं, हे याचं उद्दिष्ट आहे. इयत्ता ६ वी ते १२ च्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा देशातला सर्वात मोठा विद्यार्थीं-नवोन्मेष उपक्रम असून, विकसित भारत २०४७चा दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.